breaking-newsक्रिडा

संतोष धर्माधिकारी, प्रशांत पवार, आकाश पाडाळीकर, अनुपम झा तिसऱ्या फेरीत

डेक्‍कन जिमखाना अखिल भारतीय खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा 
पुणे – डेक्‍कन जिमखानाच्या संतोष धर्माधिकारी व प्रशांत पवार, आकाश पाडाळीकर व अनुपम झा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना पहिल्या डेक्‍कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेत तिसरी फेरी गाठली. डेक्‍कन जिमखाना क्‍लबतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

डेक्‍कन जिमखाना येथील स्नूकर हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत क्‍यू मास्टर्स संघाच्या आणि भरात असलेल्या अनुपम झा याने स्नूकर क्‍लबच्या साहिल गाहिया याचा 66 (57)-14, 34-58, 65 (58)-14, 60-27 असा सहज पराभव केला. अनुपम याने आपल्या खेळीत 57 आणि 58 गुणांचे ब्रेकही नोंदविले. डेक्‍कन जिमखानाच्या संतोष धर्माधिकारी याने क्‍यू क्‍लबच्या ऍश्‍ले डिसुझा याचा 78-08, 58-34, 81-14 असा सरळ फ्रेममध्ये पराभव करून तिसरी फेरी गाठली.

आणखी एका सामन्यात एपीजच्या आकाश पाडाळीकर याने पूना क्‍लबच्या कुणाल वासवानी याचा 52-24, 69-18, 70-14 असा सरळ फ्रेममध्ये पराभव करून तिसरी फेरी गाठली. तर डेक्‍कन जिमखानाच्या प्रशांत पवार याने सुनील अलगुडे याचा 53-43, 54-22, 67-60 असा सहज पराभव करून अंतिम 32 खेळाडूंमध्ये आपले स्थान निश्‍चित केले.

सविस्तर निकाल- 
पहिली फेरी – अनुपम झा (क्‍यू मास्टर्स) वि.वि. अशितोष शिर्के 61-24, 64-27, 82-29, रितेश सिदवानी (क्‍यू क्‍लब) वि.वि. स्वप्निल पाटील (रॉयल्स्‌) 69-12, 84-06, 70-30, केरिश गुर्बानी (मुंबई) वि.वि. दर्शन गजभिये (कॉनर्र पॉकेटस्‌) 76-27, 73-17, 48-47, योगेश कुमार (टेबल्स्‌) वि.वि. प्रसाद परवंडे (क्‍यू मास्टर्स) 60-17, 50-64, 54-61, 70 (57)-30, 59-19, साहिल गादिया (स्नूकर क्‍लब) वि.वि. जयंत साजगुरे (डेक्‍कन) 64-26, 50-07, 68-16, जयदीप खांडेकर (डेक्‍कन) वि.वि. अमर राईकर (क्‍यू क्‍लब) 38-40, 40-53, 48-29, 74-48, 63-50, अरुण बर्वे (पीवायसी) वि.वि. कुणाल रोकडे (ठाणे) 38-58, 52-39, 70-34, 61-56, सुमे मार्गो (क्‍यू क्‍लब) वि.वि. अश्‍विन पळणीटकर (पुणे) 75-21, 71-14, 61-55, श्रीनिवास कस्तुरी (मध्यप्रदेश) वि.वि. सचिन बिचे (डेक्‍कन) 60-34, 53-19, 56-54,
दुसरी फेरी-

अनुपम झा (क्‍यू मास्टर्स) वि.वि. साहिल गादिया (स्नूकर क्‍लब) 66 (57)-14, 34-58, 65(58)-14, 60-27, संतोष धर्माधिकारी (डेक्‍कन) वि.वि. ऍश्‍ले डिसुझा (क्‍यू क्‍लब) 78-08, 58-34, 81-14, आकाश पाडाळीकर (एपीज्‌) वि.वि. कुणाल वासवानी (पूना क्‍लब) 52-24, 69-18, 70-14, प्रशांत पवार (डेक्‍कन) वि.वि. सुनिल अलगुडे (डेक्‍कन) 53-43, 54-22, 67-60.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button