breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यात आता ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी होणार: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

राज्यातील ग्रामीण भागातील गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या अभियानाची अंमलबजावणी राज्यातील ३४ जिल्हे व ३५१ तालुक्यात इन्टेन्सिव्ह पद्धतीने काम करण्यात येत आहे. अभियानांर्गत आतापर्यंत ४.२३ लक्ष स्वयं सहाय्यता गटांची स्थपना झालेली आहे. ४५ लक्ष कुटुंबांना अभियानाशी जोडले आहेत. अभियानामार्फत जवळपास रु. ८२३ कोटी समुदाय एवढा निधी तर बँकामार्फत रु. ६६०० कोटीचे कर्ज गटांना उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे, अभियानांर्गत १०.८३ लक्ष कुटुंबांनी उपजीविकेचे विविध स्त्रोत निर्माण केले असून त्यामाध्यमातून जवळपास रु. १०७० कोटींचे उत्पन्न निर्माण झालेले आहे. गावपातळीवर जवळपास ४० हजार प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्ती कार्य करत आहेत, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

या अभियानांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनास हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शन शासनातर्फे राबवण्यात येते. यावर्षी दिनांक १७ जानेवारीपासून या प्रदर्शनाचा आरंभ मुंबईत होणार आहे. १७ जानेवारीला सकाळी ११ वाजता राज्यपाल मा. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते बीकेसी बांद्रा (पूर्व), मुंबई येथे प्रदर्शनाचा शुभारंभ होईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. या प्रदर्शनात ५११ स्टॉल्स असणार असून त्यापैकी ७० खाद्यपदार्थाचे स्टॉल्स असणार आहेत. या प्रदर्शनात उपस्थित राहणाऱ्या महिलांची निवास व प्रवासाची व्यवस्था अभियानामार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button