breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

World Cup 2023 : अशाप्रकारे वर्ल्डकप फायनल आणि सेमीफायनलचे तिकीट खरेदी करता येणार

World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सलग ८ साखळी सामने जिंकणारा भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. यामुळे भारतीय संघाला सेमी फायनलचे तिकीट मिळाले आहे. त्यामुळे पहिला सेमीफायनल सामना भारतीय संघ खेळणार आहे. आता अशा परिस्थितीत तुम्हालाही सेमीफायनल आणि फायनल मॅचची तिकिटे खरेदी करायची असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तर आपण सेमी फायनलचे व फायनल सामन्याचे टाकिती कुठे व कसे खरेदी करता येऊ शकते हे जाणून घेणार आहोत..

इंग्लंड क्रिकेट टीमची फॅन आर्मी ‘इंग्लंड बर्मी आर्मी’ सेमीफायनल आणि फायनलची तिकिटे विकत आहे. इंग्लंडच्या बार्मी आर्मीच्यावतीने याबाबद्दलची माहिती देताना असे लिहिले आहे की, नुकत्याच योजनेत झालेल्या बदलामुळे आमच्याकडे उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी तिकीट पॅकेज शिल्लक आहेत. तुम्ही ही तिकिटे संपूर्ण पॅकेजसह खरेदी करू शकता. याशिवाय क्रिकेटप्रेमींना सेमी फायनलच्या तिकिटासोबत हॉटेलमध्ये राहण्याचा देखील समावेश आहे.

हेही वाचा – दहशतवाद्यांचा पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट, अतिरेक्यांना सिरियातून आदेश 

या ICC विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड स्पर्धेतून बाहेर आहे. सलग सहावा सामना गमावल्यानंतर गतविजेता इंग्लंड संघ २०२३ च्या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. इंग्लंडला अजूनही नेदरलँड आणि पाकिस्तानविरुद्ध दोन साखळी सामने खेळायचे असले तरी त्याचा संघाला काहीही उपयोग होणार नाही. इंग्लंडसाठी विश्वचषक पूर्ण करण्यासाठी उर्वरित दोन सामने ही औपचारिकता म्हणून खेळावे लागणार आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत इंग्लंडच्या संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला आहे.

असे असणार सेमीफायनल आणि फायनलचे वेळापत्रक :

भारत आणि नेदरलँड यांच्यात रविवारी १२ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेतील ४५ वा शेवटचा साखळी सामना खेळवला जाणार आहे. यानंतर बुधवार, १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला उपांत्य सामना होणार आहे. त्यानंतर दुसरा उपांत्य सामना गुरूवार, १६ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन येथे होणार आहे. अखेर रविवारी म्हणजेच १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button