breaking-newsमनोरंजन

भंसालीच्या “गंगूबाई काठियावाडी’मध्ये आलिया भट्ट

बॉलिवुडमधील प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री डायरेक्‍टर संजय लीला भंसालीसोबत काम करण्यासाठी उत्सुक असतात. याच यादीत आता आलिया भट्‌टच्या नावाचा समावेश झाला आहे. ती भंसाली यांच्या आगामी “गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात झळकणार आहे. मात्र, तिच्या ऑपोजिट कोण भूमिका साकारणार हे अद्याप निश्‍चित नाही.

भंसाली यांच्या बीग बजेट असलेला हा चित्रपट पुढील वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया मुख्य भूमिका साकारणार आहे. तर मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनचे नाव आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिक संजय लीला भंसाली प्रॉडक्‍शनमध्ये काम करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, अद्याप त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या “ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात आलिया दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोब अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांनी काम केले आहे. हा चित्रपट वर्षाअखेर प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button