breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
विनयभंग करणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला अटक
पिंपरी – तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला चिखली पोलिसांनी अटक केली. शिरूर येथे नातेवाईकांच्या घरातून रविवारी ( दि.१४) त्यास अटक करण्यात आली.
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आर. व्ही. पालवे असे अटक केलेल्या पोलिसाचे नाव आहे. याबाबत ३६ वर्षीय महिलेने चिखली पोलिस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालवे हा शिरूर येथे आपल्या नातेवाईकाकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.