breaking-newsराष्ट्रिय

कोरोना लसीच्या उत्पादनावरून होणाऱ्या वादांवर ICMR चा मोठा खुलासा

नवी दिल्ली : वैद्यकिय क्षेत्रातील काही अभ्यासकांनी कोरोना व्हायरसवरील भारतीय बनावटीच्या लसीचं उत्पादनासाठी अधिक घाई न तयार करण्याचा इशारा दिला आहे. १५ ऑगस्टपर्यंत बाजारात कोरोना व्हायरसवरील ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस बाजारात आणण्यासाठी आग्रही असणाऱ्या आयसीएमआरकडून लसीच्या निर्मिती आणि उत्पादनावर होणाऱ्या टीकेला उत्तर देत शनिवारी मोठा खुलासा करण्यात आला आहे. 

भारतीय आयुर्विज्ञान संस्थान परिषद अर्थात आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार वैद्यकिय चाचण्यांसाठी निवडण्याच आलेल्या संस्थाप्रमुखांना आयसीएमआरकडून देण्यात आलेलं पत्र हे चाचणीदरम्यान कोणत्याही आवश्यक प्रक्रियेला न वगळता यामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या हेतूनं आणि होणारी दिरंगाई कमी करण्याच्या हेतूनं होतं. 

आयसीएमआरकडून कोरोनावरील या लसीच्या उत्पादनासाठी आखून देण्यात आलेली तारीख ही वेळेच्या मर्यादेपेक्षा अधिक कमी असल्याचं म्हणत संभाव्य धोका काही अभ्यासकांनी मांडला होता. त्यावरच उत्तर देत लसीची सर्वश्रेष्ठ मार्ग अवलंबत आणि अतिशय सावधगिरी बाळगतच चाचणी केली जाणार असल्याचं आयसीएमआरनं सांगितलं. शिवाय भारतीयांची सुरक्षितता आणि त्यांच्या हितालाच सर्वतोपरी प्राधान्य देण्यात आल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला. शिवाय कोरोनावर मात करण्यासाठी म्हणून जागतिक स्तरावरही या प्रक्रियेला अशाच पद्धतीनं गती देण्यात आल्याचा मुद्दा आयसीएमआरनं उचलून धरला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button