TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबई

चिंचवड स्टेशन परिसरात गुंडाची दहशत, वाहनधारकांकडून हफ्ते वसुलीसाठी करताहेत दमदाटी, वाहनचालक, मालक दहशतीखाली…

पिंपरी-चिंचवडः

चिंचवड स्टेशन परिसरात मुंबई-पुणे महामार्गावर चिंचवड ते दादर प्रवाशी वाहतूक केली जाते. या ठिकाणी प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी असलेल्या प्रत्येक वाहनांकडूून बेकायदेशीरपणे हफ्ता वसुल केला जातो. जर कुणी हफ्ता देण्यास नकार दिला तर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जाते. हा संतापजनक प्रकार पिंपरी पोलिस स्टेशनच्या समोरच गुंडांकडून सुरू आहे. याबाबत प्रवासी वाहतूक करणारे संजय वाघमारे यांनी पिंपरी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड स्टेशन येथील काही गुंडाकडून आपल्या जीवाला धोका आहे. चिंचवड ते दादर अशी प्रवासी वाहतूक करत असून, प्रत्येक गाडीला येथील गुंड 300 रुपये मागतात. या विरोधात निगडी पोलिसांकडे तक्रार देखील करण्यात आली होती. त्यानंतर या गुंडांनी तक्रारदार संजय वाघमारे यांच्या भावावर प्राणघातक हल्लादेखील केला होता. याबाबत सांगताना संजय वाघमारे म्हणाले की, चिंचवड ते दादर प्रवाशी वाहतूक करत असून, माझ्या तीन गाड्या स्वताच्या मालकी हक्काचा असून, मी गेल्या वीस वर्षांपासून चिंचवड-दादर प्रवाशी वाहतूक गाड्या चालवत असून, त्या ठिकाणी हफ्तेवसुली करणारी गुंडांची टोळी असून, प्रत्येक गाडीला प्रवाशी भरल्यानंतर तीनशे रुपये हप्ता द्यावा लागत आहे. त्या संदर्भात मी निगडी पोलिस स्टेशन ह्या ठिकाणी खंडणी वसूल प्रकरणी गुन्हा दाखल केला होता म्हणून याचा राग धरून गुंड टोळींनी माझ्या चिंचवड ते दादर प्रवाशी वाहतूक गाड्या बंद केल्या आहेत.

परिणामी, संजय वाघमारे यांच्यावर उपवासमारीची वेळ आली असून, त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. त्या संदर्भात पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांना लेखी पत्राद्वारे मागणी करण्यात आली असून वाघमारे यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वाघमारे सध्या न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button