breaking-newsपुणेमहाराष्ट्र

विद्यापीठस्तरीय प्राध्यापकांना सोबत घेत विद्यापीठात प्रशिक्षण कार्यक्रम

पुणे  – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्राबरोबरच देशभरातील सर्व विद्यापीठ स्तरावर उपक्रमशील शिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी प्राध्यापक प्रशिक्षण आयोजित केले जात आहेत.
केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात टीचर्स लर्निंग सेंटर सुरू झाले आहे. या उपक्रमांतर्गत विद्यापीठ संलग्न महाविद्यालये आणि राज्यातील सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या विविध कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यामध्ये देशभरातूनही प्राध्यापक सहभागी होत आहेत. विद्यापीठाच्या टीचर्स लर्निंग विभागाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवताना प्रयोगशीलतेवर भर द्यावा यासाठी खास प्रशिक्षण दिले जाते.
या उपक्रमातील दोन दिवसीय कार्यशाळा वनस्पतिशास्त्र विभागाच्या वतीने नुकतीच पार पडली. टीचर्स लर्निंग विभागाच्या संचालक प्रा. दिपाली मालखेडे म्हणाल्या, प्राध्यापकांनी नवीन कौशल्य आत्मसात करून विद्यार्थी प्रशिक्षण कौशल्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमधील प्राध्यापकांसाठी विविध विषयांना अनुसरून प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. केंद्र शासनाच्या विशेष तरतुदीमुळे सध्या विना मोबदला हे प्रशिक्षण दिले जात आहे. या कार्यशाळेत झालेल्या प्रशिक्षणाच्या आधारे प्राध्यापकांनी कालबद्ध कार्यक्रम त्यांच्या स्तरावर आखणे व इतर सहकारी प्राध्यापकांना प्रशिक्षित करणे अपेक्षित आहे. विद्यापीठात आयोजित केल्या जात असणाऱ्या नियोजित कार्यक्रमांपलीकडे जाऊन एखाद्या जिल्ह्यासाठी स्वतंत्र असे प्रशिक्षण कार्यशाळा भविष्यात राबवण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये होणाऱ्या कार्यशाळेत सहभागासाठी विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी [email protected] या इमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button