breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

पोटनिवडणूक निकाल अपडेट : अकराव्या फेरीअखेर भाजपाच्या अश्विनी जगताप ८ हजार ५५४ मतांनी आघाडीवर!

पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

अकरावी फेरी अखेरीस अश्विनी जगताप आघाडीवर

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत अकराव्या फेरी अखेरीस भाजपच्या अश्विनी जगताप यांनी लीड कायम ठेवलं आहे. जगताप यांना ३९९१८ तर नाना काटे यांना ३११९४ तर अपक्ष राहुल कलाटे यांना १२२४५ मते मिळाली आहेत.

नवव्या फेरीअखेरीस अश्विनी जगताप आघाडीवर

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत नवव्या फेरी अखेरीस भाजपच्या अश्विनी जगताप यांनी लीड कायम ठेवलं आहे. जगताप यांना ३२२८८ तर नाना काटे यांना २५९२२ तर अपक्ष राहुल कलाटे यांना १०७०५ मते मिळाली आहेत.

चिंचवडमध्ये आठव्या फेरीअखेरीस भाजपच्या अश्विनी जगताप या २८७२९ मतांसह अघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे २३८०० आणि अपक्ष राहुल कलाटे यांना १००५१ मतं मिळाली आहेत.

कसबा पेठ सातवी फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर २३०८० मतांनी आघाडीवर आहेत. तर हेमंत रासने २०३६३ आणि आनंद दवे १०० मते मिळाली आहेत. चिंचवडमध्ये सातवी फेरी अखेरीस अश्विनी जगताप २१२३७ मतांसह आघाडीवर आहेत. तर नाना काटे १७८३७ आणि राहुल कलाटे ७९०७ मते मिळाली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button