breaking-newsपुणेमहाराष्ट्र

शाळेने शुल्काची सक्‍ती करु नये

  • ज्ञानगंगा शाळेबाबत शिक्षण उपसंचालकांचे आदेश

पुणे – पालकांवर शुल्काची अतिरिक्‍त रक्‍कम करण्यासाठी दबाव टाकू नये तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची सक्‍ती करु नये असे आदेश शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी सिंहगड रस्त्यावरील ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम स्कूलबाबत काढले आहेत.
टेमकर यांच्याकडे पालक -शिक्षक संघाचे उपाध्याक्ष अमित धारणे यांनी तक्रार केली होती. यामध्ये ज्ञानगंगा इंग्लिश मिडीयम स्कूलकडून 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी बेकायदा शुल्काची मागणी करणे, चेकच्या माध्यमातून शुल्क न स्विकारणे, न्यायालयीन आदेशाचा चुकीचा निष्कर्ष काढून पालकांना शुल्क भरण्याची सक्‍ती करणे आदी तक्रारी करण्यात आल्या होत्या. याबाबत टेमकर यांनी काढलेल्या पत्राकात नमूद केल्याप्रमाणे, शुल्क विनिमय कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी. या चालू शैक्षणिक वर्षातील शुल्काबाबत सद्यस्थितीमध्ये जे पालक नियमित शुल्क 25 हजार रूपये भरणा करण्यास तयार आहेत, त्यांच्याकडून ते तात्काळ जमा करून घ्यावे. शैक्षणिक शुल्क विशिष्ट स्वरूपातच (रोख) भरावे असे सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button