breaking-newsपुणेमहाराष्ट्र

प्राध्यापक एकत्रित संशोधन प्रकल्प हाती घेणार

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात नाविन्यपूर्ण प्रयोग

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील तत्त्वज्ञान विभागाने एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विभागीय संशोधन विकास कार्यक्रमांतर्गत या
विभागामधील सर्व प्राध्यापकांनी विविध संशोधन प्रकल्प घेऊन त्यावरील संशोधन एकत्रितपणे प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. विभागात विविध स्वरुपाचे संशोधन
सध्या सुरु असले. तरी, सर्व अध्यापकांनी विशिष्ट कालमर्यादेत एकत्रित संशोधन करण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. रवींद्र मुळे यांनी दिली.
या प्रकल्पांतर्गत विभागामधील सर्व अध्यापक छोटे संशोधन प्रकल्प हाती घेतील. या प्रकल्पांस एक वर्षाची निश्‍चित कालमर्यादा असेल. या प्रकल्पांमध्ये तात्त्विक, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक , भाषा, अशा विविध विषयांसंदर्भातील संशोधन करण्यात येईल. या प्रकल्पास निश्‍चित कालमर्यादा असल्याने सर्व संशोधकांचा एकमेकांशी सातत्याने संवाद होत राहिल. विभागीय संशोधन विकास कार्यक्रमांतर्गत तत्त्वज्ञान विभागाला मिळणाऱ्या निधीचाही यामधून योग्य वापर होईल. वर्षाअखेरीस हे संशोधन नंतर एकत्रित करून पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात येईल असे प्रा. मुळे यांनी सांगितले. या प्रकल्पात विभागामधील डॉ. मोहित टंडन, डॉ. श्रीधर आकाशकर, डॉ. हरीश नवले, डॉ. करिलेमला, प्रा. आशिष सांगळे आणि प्रा. मुझफ्फर मल्ला हे अध्यापक सहभागी होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button