breaking-newsमनोरंजन

या टीव्ही अभिनेत्रीनं दिली कतरिना, ऐश्वर्याला मात, ठरली ‘Sexiest Asian Women’

‘युके विकली इस्टर्न आय’नं 2018 मधल्या आशियातील सर्वात मादक अभिनेत्रींची यादी जाहिर केली. या यादीत सर्वाधिक भारतीय अभिनेत्रींचा समावेश असून दीपिका पादुकोन आणि प्रियांका चोप्रा या यादीत अव्वल ठरल्या आहेत. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून Sexiest actress म्हणून जी अभिनेत्री ओळखली जाते त्या कतरिनाचं नाव या यादीतील टॉप ५ अभिनेत्रींमध्ये नव्हतं. कतरिनाला मागे टाकत छोट्या पडद्यावरची अभिनेत्री हिना खान हिनं या यादीत आपलं स्थान बळकट केलं आहे.

या यादीत हिना खान ही आठव्या क्रमांकावर आहे तर कतरिना नवव्या स्थानी आहे. ऐश्वर्या आणि कतरिना या दोघांनाही मागे टाकत हिनानं आपलं नाव या यादीत बळकट केलं आहे. सध्या हिना एकता कपूरच्या ‘कसौटी झिंदगी की’ मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिला इतर कलाकारांच्या तुलनेत सर्वाधिक मानधन दिलं जात आहे. लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्रींबरोबरच छोट्या पडद्यावरच्या अनेक अभिनेत्रींची नावं  या यादीत पाहायला मिळत आहे. त्यात जेनिफर विंगेट. एरिका फर्नांडिस, दृष्टी धामी या टेलिव्हिजन अभिनेत्रींचा समावेश आहे. तर बाहुबली फेम अनुष्का शेट्टी ही २२ व्या क्रमांकावर तर ऐश्वर्या राय बच्चन ही ३० व्या क्रमांकावर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button