breaking-newsताज्या घडामोडी

महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाही : प्रफुल्ल पटेल

गोंदिया | महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत, अशा चर्चा सुरु आहे. मात्र, ही चुकीची धारणा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिलं. गोंदिया इथे सोमवारी (6 जुलै) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे, हे खरे आहे. मात्र, मुंबईत आयुक्तांच्या अंतर्गत या बदल्या झाल्या. त्यांच्या बदलांच्या पत्रावर मंत्रालय किंवा गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्वाक्षरी नव्हती. तसंच या बदल्या महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना न दाखवता या बदल्या झाल्या, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button