breaking-newsराष्ट्रिय

प्रियांकाच्या भरजरी लग्न पोशाखावर आई वडिलांचं नाव आणि….

प्रियांका चोप्रा ही गेल्याच आठवड्यात विवाहबंधनात अडकली. या सोहळ्यातली प्रत्येक गोष्ट खास आणि चर्चेचा विषय ठरली होती. प्रियांका-निकच्या लग्नासाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर राल्फ लॉरेन यानं खास वेडिंग गाऊन तयार केला होता. एखाद्या सेलिब्रिटीसाठी वेडिंग गाऊन तयार करण्याची ही राल्फ लॉरेन ब्रँडची पहिलीच वेळ होती. जवळपास २ लाख मोती या ड्रेसवर जडवण्यात आले होते. या सुंदर वेडिंग गाऊनच्या वेलची लांबीदेखील ७५ फूट होती. त्यामुळे प्रियांकाचा वेडिंग गाऊन हा चर्चेचा विषय ठरला. मात्र या वेडिंग गाऊनला आणखी एक गोष्ट सर्वांहूनही वेगळी ठरवत होती. ती म्हणजे या वेडिंग गाऊनमध्ये लपलेले ८ संदेश होय.

प्रियांका ही ग्लोबल स्टार आहे. युनिसेफची ती सदिच्छादूत आहे त्यामुळे आपलं काम, प्रेम आणि शांतीचा संदेश देणारे आठ वेगवेगळे संदेश तिनं आपल्या ड्रेसवर लिहून घेतले होते. याव्यतिरिक्त आपल्या आई वडिलांचं नाव, लग्नाची तारीख, हिंदू मंत्र निक आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावाचं भरतकामही तिनं आपल्या वेडिंग ड्रेसवर करून घेतलं होतं. याव्यतिरिक्त हिंदू विवाहसोहळ्यात तिनं परिधान केलेल्या लेहंग्यावर देखील अशाच प्रकारे संदेश आणि नावं भरतकाम स्वरूपात तिनं लिहून घेतली होती. हा लेहंगा प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीनं तयार केला होता. जवळपास ३ महिने मेहनत घेऊन लाल रंगाचा लेहंगा प्रियांकासाठी तयार करण्यात आला होता.

यापूर्वी दीपिकानं लग्नासाठी जो लेहंगा परिधान केला होता त्यावर अशाच पद्धतीचे हिंदू मंत्र आणि आशीर्वाद लिहिण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button