breaking-newsपिंपरी / चिंचवड

मोशीतील महिलेचा “स्वाईन फ्लू’ने मृत्यू

पिंपरी – शहरामध्ये “स्वाइन फ्लू’च्या रुग्णांच्या मृत्यूमध्ये सतत वाढ होत आहे. या आजाराने शुक्रवारी (दि. 28) एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 27 झाली आहे. तर चार बाधित रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 189 वर गेली आहे.

शहरात “स्वाइन फ्लू’च्या रुग्ण संख्येमध्ये दिवसें-दिवस भर पडत आहे. या जीवघेण्या आजाराने शुक्रवारी (दि. 28) मोशी येथील 58 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे “स्वाइन फ्लू’च्या आजाराचा धोका वाढताना दिसत आहे.

हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याच्या संख्येमध्ये वाढच होताना दिसत आहे. सध्या सकाळी ऊन व दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होत असून यामुळे “एच1एन1′ विषाणूंना पोषक परिस्थिती तयार होत आहे. या वातावरणामुळे हा आजार बळावत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button