breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

पिंपरी ते निगडी विस्तारी मेट्रोसाठी राज ठाकरे केंद्राकडे पाठपुरवठा करणार

पिंपरी ते निगडी विस्तारी मेट्रोसाठी मनसे सौनिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

पिंपरी : पिंपरी ते निगडी विस्तारित मेट्रो मार्ग या मार्गाचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे. यासाठी आज पिंपरी चिंचवड शहराचे मनसे शहरअध्यक्ष सचिन चिखले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

निगडी ते पिंपरी विस्तारित मार्ग 4.41 किलोमीटर आहे. यामध्ये चिंचवड, आकुर्डी व निगडी अशी तीन मेट्रो स्टेशन आहेत. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. राज्य शासनाकडून 170 कोटीचा भार उचलण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासन व पिंपरी चिंचवड महानगरपालिका उर्वरित भार उचलणार आहे.

पिंपरी ते निगडी विस्तारित मार्ग यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला, तर नंतर स्थायी समितीने सुद्धा यासाठी मंजुरी दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 27 फेब्रुवारी 2019 ला हिरवा कंदील दाखवला होता. आताही मंजुरी अंतिम टप्प्यात असून केंद्राने लवकरात लवकर मंजुरी द्यावी व निगडी ते पिंपरी काम लवकर चालू व्हावे यासाठी राज ठाकरे यांच्याकडे मागणी करण्यात आली. यावर राज ठाकरे यांनी या प्रकरणात मी लक्ष देऊन हे काम मार्गी लावतो असं आश्वासन दिलं.

आज मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील शहर मनसे व पिंपरी चिंचवड सिटीजन फोरम राजीव भावसार, तुषार शिंदे, सूर्यकांत मुथियान हे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button