breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुलींना सक्षम करण्यासाठी वाकडमध्ये कराटे क्लासेस सुरु करणार

पिंपरी – मुलींना भयमुक्त जगता यावे, त्यांना स्वताःचे संरक्षण करता यावे, त्या सक्षम व्हाव्यात, याकरिता महापालिकेच्या वाकड येथील शाळेत उर्मी संस्थेकडून कराटे क्लास सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण समिती सभापती साेनाली गव्हाणे यांनी दिली.   यावेळी उपसभापती शर्मिला बाबर, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, संगिता भोंडवे, शारदा सोनवणे, उर्मीचे संस्थेचे राहूल शेंडे उपस्थित होते.
गव्हाणे म्हणाल्या की,  शिक्षण समितीच्या बैठकीतून पालिकेच्या शाळेतील मुलींना कराटेचे  शिक्षण देण्याची संकल्पना पुढे आली. महापालिका शाळेतील मुलींना “ उर्मी” संस्थेच्या माध्यमातून कराटे क्लास पुढील महिन्यापासून सुरु करणार आहे. तसेच पालिकेच्या इतर शाळांमध्येही अन्य विविध संस्थेच्या मदतीने कराटे क्लास सुरु करणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button