breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुख्यमंत्र्याच्या पोकळ घोषणा ; अनधिकृत बांधकाम, शास्तीकरांचा प्रश्न रखडला

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचा आरोप 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवडचा अनधिकृत बांधकाम, शास्तीकरांचा प्रश्न सुटावा म्हणून काहीजण राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले. शहरवासियांना निवडणुकीत आम्हाला सत्ता द्या, हे प्रश्न शंभर दिवसात सोडविण्याची वल्गणा केली. सत्ता येवूनही चार वर्षे लोटली तरीही हे प्रश्न सुटलेले नाहीत. शास्तीकर, अनधिकृत बांधकामाचे प्रश्न सुटल्याच्या आनंदात पेढे वाटून फलक लावले, मात्र, मुख्यमंत्री केवळ पोळक आश्वासन देवून जनतेला वेढ्यात काढत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला. तसेच शास्तीकर शंभर टक्के कायमस्वरुपी माफी द्यावी, अनधिकृत बांधकामे 1 रुपया स्ववेअर फुट दंड आकारुन माफ करा, अशी मागणी केली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, प्रशांत शितोळे, नगरसेवक विक्रांत लांडे, राजू बनसोडे उपस्थित होते. 

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन देण्यात आले.  तसेच याबाबत वाघेरे म्हणाले कीअनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने कुंटे समितीची स्थापना केली. समितीचा अहवाल येताच राज्यात सत्तांतर झाले. भाजपच्या नेत्यांनी 100 दिवसात अनधिकृत बांधकामे नियमित करु, शास्तीकर 100 टक्के माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्यापही प्रश्न मार्गी लागला नाही. सरकारने बांधकामे नियमित करण्याचा कायदा केला. खरा परंतु, त्यामध्ये जाचक अटी-शर्ती आहेत. त्यामुळे नियमितीकरणास नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत असून त्याचा लाभ नागरिकांना होत नाही”

अवैध बांधकामाला शास्तीकर लागू झाल्यापासून 100 टक्के माफी देण्यात यावी. दंड, व्याज, चक्रवाढ व्याज आकारले असेल तर माफ करण्यात यावे. अनधिकृत बांधकामांना एक रुपया प्रति स्कवेअर फूट नियमन शुल्क एकदाच आकारण्यात यावे. व्यावसायिक बांधकामांना पाच रुपये प्रति स्कवेअर फूट नियमन शुल्क असा एकदाच दंड आकारण्यात यावा, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button