breaking-newsमहाराष्ट्र

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या बेडरुममध्ये राफेलची फाईल? काँग्रेसकडून ऑडिओ क्लिप जारी

नवी दिल्ली : राफेल विमान कराराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्याच्या फाईल आहेत, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या विधानाला दुजोरा देण्यासाठी गोव्यातील विद्यमान आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची ऑडिओ क्लिप समोर आणली असून, यात विश्वजीत राणे हे स्वत: सांगत आहेत की, पर्रिकरांच्या बेडरुममध्ये राफेल कराराच्या फाईल्स आहेत.

लोकसभेतही आज राफेल कराराच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता असतानाच, काँग्रेसने राफेलसंदर्भात सनसनाटी ऑडिओ क्लिप जारी करुन मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यात, वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टात राफेलच्या निर्णयावरील पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

विश्वजीत राणेंचं स्पष्टीकरण

“काँग्रेसने ऑडिओ क्लीपशी छेडछाड केली आहे. काँग्रेसने अशाप्रकारे खालच्या थराला जाणं थांबवलं पाहिजे. मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री पर्रिकर यांच्यात विसंवाद निर्माण व्हावा म्हणून काँग्रेसने हे तयार केलंय. पर्रिकरांनी राफेल किंवा कोणत्याही कागदपत्रासंदर्भात विधान केले नाही. त्यामुळे चौकशी करण्याची मागणी करणार आहे.”, असे विश्वजीत राणे यांनी सांगितले.

https://twitter.com/ANI/status/1080359377754832897

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button