breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Thergaon : प्राधिकरण प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात

  • बकालपणा वाढण्यास प्राधिकरण जबाबदार
  • दाटीवाटीच्या भागामुळे अग्निशामक दलाची कसरत

पिंपरी (महा ई न्यूज) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे एखाद्याचा बळी जाण्याची परिस्थिती थेरगाव परिसरातील नागरिकांवर ओढवली आहे. आज शनिवारी (दि. 29) सकाळी नऊच्या सुमारास श्रीनगर भागातील शिवशंभो सोसायटीच्या पाठीमागील बाजुला विद्युत विभागाचा ट्रान्सफॉर्मर स्पार्क होऊन आग लागली. यात मोलमजुरी करून पोटाची खळगी भरण्यासाठी खरेदी केलेला एका व्यक्तीचा छोटा टेम्पो आणि एकाची दुचाकी जळून खाक झाली. जवळच खेळत असलेल्या एका बालिकेला वेळीच बाजुला घेतले नसते तर आज त्या कुटुंबियांवर शोककळा पसरली असती. अत्यंत विदारक परिस्थिती असताना प्राधिकरण प्रशासनाने वेळीच कारवाई करून हे अतिक्रमण रोखले असते, तर आज ही घटना घडली नसती.

थेरगावातील शिवशंभो सोसायटी परिसरात ट्रान्सफॉर्मर आहे. या ट्रान्सफॉर्मरला सकाळी नऊच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये एक दुचाकी आणि टेम्पो जळून खाक झाला. स्थानिक नगरसेवक कैलास बारणे यांच्या तत्परतेमुळे संत तुकारामनगर अग्निशामक दलाचा एक बंब आणि रहाटणीतील एक असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या भागातील नागरिकांनी अतिक्रमण करून बेकायदेशीर घरे बांधल्यामुळे दुचाकी सोडली तर अंतर्गत भागात चारचाकी वाहन सुध्दा जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती या भागाची झाली आहे. त्यातच नागरिकांनी रस्त्याच्या बाजुला नाल्यांवर बांधकाम केले आहे. त्यामुळे या भागात अग्निशामक दलाचे बंब जाण्यास अडथळे आले. अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनी कार्यतत्परता दाखविली. मात्र, बंब जाण्यासाठी पुरेसी जागाच उपलब्ध नसल्यामुळे अग्निवर पाण्याचा मारा करता येत नव्हता. अखेर बंब लांबच उभा करून पाईपलाईनद्वारे पाणी मारून आग नियंत्रणात आणण्यात आली. ट्रान्सफॉर्मरची आग बाजुलाच असलेल्या लाकडी वखारीला लागली असती तर, अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनी वेळीच उपाययोजना केल्याने पुढील अनर्थ टळला.

संपूर्ण थेरगाव भागात दैनंदीन विद्युत विभागाचा लपंडाव सुरू असतो. कारण, नागरिकांनी अतिक्रमण करून बेसुमार बांधकामे केली आहेत. बांधकामे एवढी झाली आहेत की, विद्युत विभागाचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी देखील पुरेसी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे मिळेत त्याठिकाणी विद्युत विभागाने नागरिकांची सोय करण्यासाठी असे ट्रान्सफॉर्मर उभे केले आहेत. त्याला सुरक्षित तारेचे कंपाऊंड घातले नाही. त्यामुळे नागरिकांचा स्पर्श होण्याची शक्यता आहे. त्यातच एखाद्या उंच वाहनाचा धक्का देखील या ट्रन्सफॉर्मला लागू शकतो. दाटीवाटीचा भाग असल्याने या भागात मोठी रहदारी असते. तरीही, प्राधिकरण प्रशासन मुग गिळून गप्प आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या भागात बकालपणा वाढला आहे. बेसुमार अतिक्रमण वाढले असून नागरिकांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. मजल्यावर मजले चढवून वार्षीक लाखो रुपयांचे भाडे उकळले जात आहे. तरीही, प्राधिकरण प्रशासन येथील नागरिकांना साधी नोटीस पाठविण्याची तसदी घेत नाही. त्यामुळे निष्पाप लोकांवर बळी देण्याची वेळ आली आहे.

 

आगीची माहिती कळताच 10 मिनिटांमध्ये आम्ही बंब घेऊन घटनास्थळी पोहोचलो. मात्र, आगीच्या घटनेपर्यंत जाण्यासाठी पुरेसी जागा नव्हती. त्यातच आग पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी दुचाक्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला लावलेल्या होत्या. कितीही विनंती केली तरी नागरिक आपल्या दुचाक्या बाजुला काढत नव्हते. जवळपास आग आणि बंब याच्यामध्ये 500 फुटाचे अंतर होते. त्यामुळे पाण्याचा मारा तेवढ्या लांब जाणे शक्य नव्हते. कशीबसी गाडी आत घेऊन फोमचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले. आम्हाला घटनास्थळी पोहोचण्यास आणखी 15 मिनिटे विलंब झाला असता तर ट्रान्सफॉर्म शेजारील लाकडी वखार पेटली असती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवणे कंठीन झाले असते. संपूर्ण वसाहत निर्मनुष्य करावी लागली असती. तब्बल 20 मिनिटात आग आटोक्यात आणली.

भगवान यमगर, लिडिंग फायरमन, रहाटणी

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button