महाराष्ट्र

मराठा आरक्षण मोर्चा : तरुणाने केले विष प्राशन, आत्महत्तेचा केला प्रयत्न

शिर्डी – काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात मराठा संघटना आक्रमक झाल्या असून बुधवारी शिर्डीजवळील कळंब येथे एका तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. कृष्णा गंभीर असे या तरुणाचे नाव असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजते.

 

गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे या आंदोलकाच्या मृत्यूनंतर मराठा आंदोलनाचे स्वरूप तीव्र झाले आहे. मंगळवारी देवगाव रंगारी येथे सकल मराठा मोर्चाचा जयेंद्र द्वारकादास सोनवणे याने नदीपात्रात उडी टाकली. त्याला औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

या घटनेनंतर आता बुधवारी शिर्डीजवळील कळंब येथे कृष्णा गंभीर (वय २४) या तरुणाने विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. कृष्णावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातही बंदचे पडसाद उमटले असून नगर- मनमाड रस्त्यावर चार चाकी गाडीच्या शो रुमवर आंदोलकांनी दगडफेक केली. तर कर्जत येथे जमावाने वन विभागाची जीप जाळली. आंदोलक जीप जाळत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे समजते. बंदमुळे नगरमधील जनजीवन विस्कळीत झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button