breaking-newsआंतरराष्टीय

रवांडाला भारताची दोनशे दशलक्ष डॉलर्सची मदत

  • मोदींच्या दौऱ्यात झाला निर्णय 

किगली – भारताने रवांडाला 200 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. त्या देशाशी भारताने संरक्षण सहकार्याचा करारही केला असून रवांडाशी अधिक सहकार्य करण्याच्या इराद्याने त्या देशात भारतीय उच्चायुक्त कार्यालय सुरू करण्याची घोषणाही भारताच्यावतीने करण्यात आली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रवांडा भेटीच्यानिमीत्ताने भारतातर्फे या घोषणा करण्यात आल्या आहेत. रवांडा या देशाला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

Narendra Modi

@narendramodi

The Girinka Programme is helping transform the lives of people across rural Rwanda.

I also told President @PaulKagame about the initiatives we are taking in India for the development of our villages.

मोदी यांनी रवांडाचे अध्यक्ष पॉल कागमे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या देशात भारतीय उच्चायुक्त कार्यालय सुरू करण्याचीही घोषणा केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक दृृढ होण्यास मदत होईल असे मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. आमच्या देशाच्या आर्थिक विकासासाठी भारताने मदत देऊ केली आहे हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे असे प्रतिपादन रवांडाच्या अध्यक्षांनी यावेळी केले.

यावेळी दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये संरक्षण, व्यापार, कृषी आणि पशुपालन या क्षेत्रातील सहकार्याचे करार करण्यात आले. भारतातर्फे देऊ करण्यात आलेल्या दोनशे दशलक्ष डॉलर्स मधून औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या विकासाची कामे केली जाणार आहेत. मोदी सध्या अफ्रिकेच्या तीन देशांच्या दौऱ्यावर असून काल रात्री त्यांचे रवांडा येथे आगमन झाले. या आधी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी रवांडाला भेट दिली होंती त्या पार्श्‍वभूमीवर मोदींनी येथे दिलेल्या भेटीला विशेष महत्व दिले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button