breaking-newsपिंपरी / चिंचवड

मद्यपान करून कामावर येणा-या कर्मचा-यांवर कारवाई करा – दत्ता साने

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापालिकेच्या विविध विभागांतील काही कर्मचारी मद्यपान करून कामावर येताना दिसून आले आहेत. अशा कर्मचाऱ्यांची भरारी पथकामार्फत तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात साने यांनी म्हटले की, मागील बारा दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय येथे नातेवाईकाचा स्मशान दाखला घेण्याकरिता गेलो. त्यावेळी कामावर असणारे कर्मचारी विनोद शिंदे हे मद्यपान करून कामावर उपस्थित होते. शिंदे यांनी माझ्याशी अर्वाच्च भाषा वापरून गैरवर्तन केले. त्याबाबत 11 मार्च रोजी रीतसर तक्रार अर्ज दिला आहे. मात्र, याबाबत सविस्तर चौकशी केली असता, मनपाच्या विविध विभागांमध्ये बऱ्याच ठिकाणी कर्मचारी मद्यपान करून कामावर येत असल्याचे समजले.

या प्रकारामुळे कार्यालयीन शिस्तीचा भंग होत असून, मनपाच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. अशा प्रकारामुळे मनपाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे भरारी पथकामार्फत अथवा तपासणी पथकामार्फत अचानक भेटी देऊन कर्मचाऱ्यांची तपासणी करावी, अशी मागणी साने यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button