breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

सातारा जिल्हा आजपासून पुन्हा लॉकडाऊन; पाहा काय सुरू, काय बंद?

सातारा – जिल्ह्यातील कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी साताऱ्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सातारा जिल्हा आजपासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असून अत्यावश्यक सेवाही सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेतच सुरू राहणार आहेत. तर शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन केला जाणार आहे.

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे शनिवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. तसेच अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही, असे स्पष्ट करत सातारकरांनी आता घरातच राहून प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

लॉकडाऊन काळात काय सुरू राहणार?
– अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत उघडी राहणार
– किराणा, भाजीपाला, फळ विक्री, डेअरी, बेकरी दुकाने सुरू राहणार
– मटण, चिकन, अंडे, मासे विक्री सुरू राहणार
– रिक्षा, टॅक्सी सुरू राहणार
– खाजगी, सहकारी बँका सुरू राहणार
– सर्व बाजार समित्या सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार
– खाजगी वाहतूक सुरू राहणार
– खाजगी बसने 50 टक्के क्षमतेने वाहतूक सुरू राहणार
– पॅट्रोल पंप सुरू राहणार
– दुध संकलन केंद्र सुरू राहणार
– कृषीविषयक सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार
– शिवभोजन थाळी केवळ पार्सल सेवा सुरू असणार
– शीतगृह आणि गोदाम सुरू राहणार

लॉकडाऊन काळात काय बंद राहणार?
– शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद
– हॉटेल रेस्टॉरंट बंद, पार्सल सेवा सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत
– कोणत्याही क्रिडा स्पर्धा घेता येणार नाहीत
– सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक प्रार्थनास्थळे बंद

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button