breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘बीव्हीजी ग्रुप’चे मालक हनुमंतराव गायकवाड यांची 16 कोटींची फसवणूक

  • चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी, (महाईन्यूज) – ‘बीव्हीजी ग्रुप’चे मालक हणमंत गायकवाड व त्यांच्या पत्नीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. आकर्षक परताव्याच्या आमिषातून कंपनीत १६ कोटी ४५ लाख चार हजार ३६६ रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र, त्याचा परतावा किंवा समभाग न देता फसवणूक केली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विनोद रामचंद्र जाधव व त्याची पत्नी सुवर्णा विनोद जाधव (रा. विमाननगर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ‘बीव्हीजी’ ग्रुपचे मालक हणमंतराव रामदास गायकवाड (वय ४६, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २६ ते ३१ मार्च २०११ दरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांना आरोपी जाधव दाम्पत्याने कंपनीतील गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दिले. गुतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादी गायकवाड आणि त्यांच्या पत्नीने आरोपी जाधव यांच्या सावा मेडिको लिमिटेड कंपनी, बायोडिल लॅबोरोटिज लिमिटेड, अनघा फार्मा प्रा. लि. या कंपन्यांमध्ये १६ कोटी ४५ लाख चार हजार ३६६ रुपयांची गुंतवणूक केली. यातील १२ कोटी ४५ लाख ९५ हजार ३७४ रुपयांची सावा मेडिको लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केली. त्याच्या मोबदल्यात एक कोटी ५३ लाख ९५ हजार २३७ रुपयांचे समभाग दिले. गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा तसेच समभाग किंवा मूळ मुद्दल न देता जाधव दाम्पत्याने फसवणूक केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button