breaking-newsपुणेमहाराष्ट्र

प्लॅस्टिक वस्तू उत्पादक 13 कंपन्यांना “बंदी नोटीस’

  • पण, कारवाई “लीक’ होत असल्याने अनेक उत्पादकांचे पलायन

पुणे – बंदी असलेल्या प्लॅस्टिक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रडारवर आल्या आहे. आतापर्यंत 13 कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. तर अन्य कंपन्यांची माहिती घेण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, या पथकाचीच माहिती उत्पादकांना व्हॉट्‌स ऍप, मेसेजद्वारे पोहचत असल्यामुळे ही मंडळी पळून जाण्याच्या घटनादेखील समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कशी करणार? असा प्रश्‍न मंडळासमोर आहे.

बदलत्या निर्णयांमुळे कारवाईबाबत गोंधळ
प्लॅस्टिकबंदीबाबतचा आधीच गोंधळ, त्यात अशा उत्पादक कंपन्यांच्या माहितीबाबत साशंकता आणि त्यावर नुकताच सरकारने या बंदीतून छोट्या व्यावसायिकांना दिलेली सूट यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारावाईत अडचणी येत आहेत. माहितीचा भडिमार आणि बदलत्या परिस्थितीमुळे कारवाई करायची कशी? अशा गोंधळात मंडळाचे अधिकारी अडकले आहेत.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे विभागातील विनापरवाना प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या 13 कंपन्यांना बंदीचे आदेश दिले आहेत. तसेच आगामी काळात मंडळाचा परवाना आहे, परंतु बंदी असलेल्या वस्तूंचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.
प्लॅस्टिक बंदीच्या प्रभावी अंमबजावणीसाठी उत्पादक कंपन्यांवर कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. यांतर्गत पहिल्याच आठवड्यात पुणे विभागातील 13 कंपन्यांना बंदीचे आदेश देण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातील 6, सोलापूर-4 अणि पिंपरी-चिंचवड महानगपालिका भागातील 3 कंपन्यांचा समावेश आहे.
मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हर्षप्रसाद गंधे म्हणाले, प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग, पॉलिबॅग, ग्लास, पाऊच यांसारख्या वस्तूंचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत अशा 60 उत्पादक कंपन्यांची माहिती मंडळाकडे उपलब्ध झाली आहे. यामध्ये विनापरवाना उत्पादन घेणाऱ्या 13 कंपन्यांवर तत्काळ बंदीचा आदेश देण्यात आला आहे. आगामी काळात मंडळाची परवानगी आहे, परंतु बंदी असलेले पदार्थांचे उत्पन्न घेणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

बंद असलेल्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर सक्त कारवाई करत, मंडळातर्फे विविध पर्याय अवलंबले जात आहेत. याच अनुषंगाने मंडळातर्फे महावितरण कार्यालयाला अशा कंपन्यांचा वीज पूरवठा बंद करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
– हर्षप्रसाद गंधे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button