breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘ईडी’ने जप्त केलेल्या जमिनीवर गृहप्रकल्प

बांधकाम व्यावसायिकासह तिघांचा जामीन फेटाळला

सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या जमिनीवर गृहप्रकल्प उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकासह तिघांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वढणे यांनी फेटाळून लावला.

सय्यद मोहम्मद मसूद जमादार (वय ६१, रा. वांद्रे, मुंबई) आणि साजीद इब्राहीम वारेकर (रा. के. के. रस्ता, ठाणे) अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत, तर बांधकाम व्यावसायिक प्रवीण रामचंद्र गुरव (वय ३४, रा. हिंजवडी-माण रस्ता) यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणात मुळशीतील दोन दुय्यम निबंधकांसह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी भागातील ८६  गुंठे जमीन ‘ईडी’ने जप्त केली होती.

मुळशी तालुक्यामधील दुय्यम निबंधकांशी संगनमत करून जमादार आणि वारेकर यांनी या जमिनीची विक्री केली होती.

या जमिनीवर प्रवीण गुरव यांच्या हिंदवी स्वराज कापरेरेशन प्रा. लि. कंपनीकडून गृहप्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. या गृहप्रकल्पातील तीन इमारतीतील सदनिकांची विक्री गुरव यांनी नागरिकांना केली होती.

सदनिका खरेदीदार आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वर्षभरापूर्वी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जमादार, वारेकर यांनी या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून विशेष न्यायालयात अर्ज केला होता. तर बांधकाम व्यावसायिक प्रवीण गुरव यांनी अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात सादर केला.

जमादार यांच्या विरोधात नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. विविध योजनांत गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे  दाखल आहेत. जमादार आणि वारेकर यांचे जामीन अर्ज फेटाळून लावण्याची विनंती सरकारी वकील अ‍ॅड. प्रेमकुमार अगरवाल यांनी युक्तिवादात केली.

त्यानंतर न्यायालयाने जमादार आणि वारेकर यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. बांधकाम व्यावसायिक गुरव यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button