breaking-newsपुणे

पुण्यात दहीहंडीच्या थरारादरम्यान स्टेज कोसळला, 15 जण जखमी

पुण्यातील बुधवार पेठमध्ये दहीहंडीच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू असतानाच स्टेज कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत जवळपास 15 जण जखमी झाले आहेत.

ANI

@ANI

Stage at Dahi-Handi celebrations in Pune’s Budhwar Peth area collapsed yesterday, no major injuries were reported.

बुधवार पेठेतील डिस्को बिल्डींगच्या शेजारील शिवाजी तरुण मंडळाच्या दहीहंडीच्या बक्षिस वितरणावेळी ही घटना घडली. गोविंदा पथकाला बक्षीसाची ट्रॉफी आणि रक्कमेचं वाटप सुरू असताना अचानक स्टेज कोसळला. स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने स्टेज कोसळल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये 14 ते 15 जण जखमी झाले असून जखमींपैकी 4 ते 5 जणांना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button