breaking-newsपिंपरी / चिंचवड

Mahavikas Agahadi Vs BJP: भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करा : कुणाल सुखदेवे

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन सुरू आहे. राज्यात १४४ जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र बचाओ’आंदोलन केले. भाजपाच्या आमदार-पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येवून आंदोलन केले आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यावर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस कुणाल सुखदेवे यांनी केली आहे.

सुखदेवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात लॉकडाउन जाहीर असताना व 144 जमावबंदीचे आदेश लागू असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व सहकारी 5 पेक्षा अधिक एकत्र येऊन बेकायदेशीर पद्धतीने परवानगी न घेता आंदोलन करतात. हे सरळ सरळ कायद्याचे उल्लंघन आहे तरी आपण 144 प्रमाणे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व त्यांचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ज्यांनी ज्यांनी जमाबंदीचे उल्लंघन केले आहे या सर्वांवर कार्यवाही करावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button