breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे गुरव, भोसरी व पिंपरीत आढळले बेवारस मृतदेह

पिंपरी ( महा ई न्यूज ) – शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन दिवसात तीन बेवारस मृतदेह आढळले आहेत. शनिवारी (दि. 1) आणि रविवारी (दि. 2) पिंपळे गुरव, भोसरी व पिंपरी येथे तीन बेवारस मृतदेह आढळले आहेत.

भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली रविवारी (दि. 2) सायंकाळी पाचच्या सुमारास एका बंद कारमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. संबंधित इसम हा त्याच परिसरात दिवसभर फिरत असे आणि रात्री त्याच कारमध्ये झोपत असे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

शनिवारी पिंपळे गुरव येथे महादेव मंदिराच्या पाठीमागे पवना नदी पात्रात एका 25 वर्षीय तरुण बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तात्काळ उपचारासाठी पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आहे. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

पिंपरी येथील गांधीनगर झोपडपट्टी जवळील शनिवारी जयगणेश वरदहस्त सोसायटीच्या पोर्चमध्ये एक वृद्ध इसम बेशुद्धावस्थेत आढळल्याची पिंपरी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वृद्ध इसमाला उपचारासाठी पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वरील तीनही घटनांमधील मयत इसम हे फिरस्ती होते. त्यांच्या जवळ ओळख पटणारा कोणताही पुरावा नसल्याने त्यांची अद्याप ओळख पटू शकली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button