breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वप्न मोठे पहा, कल्पकतेला वेळीच मूर्त स्वरूप द्या – आयुक्त श्रावण हर्डीकर

पिंपरी  स्वप्न, ध्येय मोठे पाहिले पाहिजे. त्यानुसार वाटचाल करावी. भविष्याचा विचार करून आपल्या आयडीया मार्केटमध्ये पडताळून पाहिली पाहिजे. भविष्यात आपली आयडीया किती वर्षे टिकू शकते, याचा विचार करून वेळीच त्याला मूर्त स्वरूप दिल्यास यशस्वी उद्योजक होऊ शकता, असे मार्गदर्शन महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

 

भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य अमित गोरखे यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडमधील नवोदित उद्योजकांना नवीन उद्योगाबाबत माहिती देण्यासाठी एक सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत शहरात प्रथमच स्मार्ट स्टार्टअप अंतर्गत मोफत उद्योजकता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. चिंचवड, संभाजीनगर येथील रोटरी क्लबच्या हॉलमध्ये शनिवारी (दि.1) झालेल्या कार्यक्रमाला अमित गोरखे, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ‘फ’ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, शिक्षण मंडळाच्या उपसभापती शर्मिला बाबर, नगरसेवक तुषार हिंगे, महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमन, पुणे स्मार्ट स्टार्टअपचे रवी घाटे, तुषार शिंदे, अक्षय सरोदे  आदी उपस्थित होते. याशिवाय उद्योजकता शिबिरात सहभागी होण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सर्वांना सामान्यपणे जगणे चांगले वाटते. सामान्य राहायचे हे मनावर लादून घेतले असून ही मानसिकता चुकीची आहे, असे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, ज्ञानाचे मोठे क्षेत्र आहे. ते आत्मसात करून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अपयश आल्यानंतर खचून जाऊ नये, दुसऱ्यावर आणि नशिबावर त्याचे खापर फोडू नये. अपयशावर मात करणे गरजेचे आहे.

 

आयुक्त हर्डीकर पुढे म्हणाले की, “स्टार्टअप संस्कृतीचा विकास जसा पुणे व इतर शहरात झाला तसा पिंपरी चिंचवड शहरात झाला नाही, त्यासाठी महापालिकेच्या वतीने देखील स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर लवकरच सुरू करून शहरातील स्टार्टअप्सना एका छताखाली सर्व सुविधा (इकोसिस्टिम) उपलब्ध करून देण्यात येतील. अमित गोरखे यांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर हे देशातील बहुधा पहिलेच क्राऊड-फंडेड मॉडेल असावे व अशा प्रकारच्या जनसहभागाच्या प्रयत्नांनीच स्टार्टअप ना आधारभूत सुविधा उपलब्ध होऊन असे स्टार्टअप शहराचे नाव देशात उंचावतील.”

 

अमित गोरखे म्हणाले, एक सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत निगडी येथील नॉव्हेल इन्स्टिटयूटमध्ये गुरुवार व शुक्रवार यादिवशी सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत या उद्योजकता शिबिराचा लाभ तरुणांना घेता येणार आहे. नवीन उद्योग सुरु करायचा असेल किंवा त्याचा विस्तार कसा मोठा करता येईल, याबाबतचे मार्गदर्शन या शिबिरात तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे. तरी, या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आजच 9119445533 या क्रमांकावर hi असा एसएमएस सेंड करा. आपली जागा बुक करा, असे आवाहन गोरखे यांनी केले आहे. तसेच, हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत असून याचा लाभ जास्तीत जास्त तरुणांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button