breaking-newsपिंपरी / चिंचवड

वसिम इनामदार यांची विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्षपदी निवड

पिंपरी – निमा स्टुडंट फोरमचे पुणे जिल्हाध्यक्ष व एनएसयूआयचे पुणे जिल्हा महासचिव डॉ. वसिम इनामदार यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा एनएसयूआयच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

वसिम इनामदार हे महाविद्यालयीन काळापासून एनएसयूआयचे सक्रिय सदस्य आहेत. तसेच पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे ते एनएसयूआयचे अध्यक्ष आहेत. एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांच्या मान्यतेने एनएसयूआयचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे यांनी त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी वसिम इनामदार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button