breaking-newsराष्ट्रिय

धुळीच्या वादळामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत

नवी दिल्ली – उत्तर भारतात धुमाकूळ घालणाऱ्या धुळीच्या वादळाने राजधानी दिल्लीमधील सार्वजनिक जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. सोसाट्याचा वारा आणि वावटळीमुळे सार्वजनिक वाहतुकीमध्ये अडथळे आले. तसेच दिवसभर कडाक्‍याच्या उन्हानंतर संध्याकाळी थोडा पावसाचा शिकडावाही दिल्लीकरांना अनुभवायला मिळाला. वातावरणामध्ये अचानक झालेल्या बदलामुळे दिल्ली विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या किमान 10 विमानांचे हवाई मार्ग बदलावे लागले.

धुळीच्या वादळामुळे उत्तराखंड, जम्मू काश्‍मीर आणि हिमाचल प्रदेशात वावटळ आणि गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने काल वर्तवली होती. उद्या हे धुळीचे वादळ राजस्थानमध्ये थडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, पश्‍चिम उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, तेलंगण, आंध्रप्रदेशची उत्तर किनारपट्टी, दक्षिण मध्य कर्नाटक, तामिलनाडू, पुद्दुचेरी, लक्षद्वीप आणि केरळमध्येही गडगडाटासह पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button