breaking-newsपिंपरी / चिंचवड

प्रशासनाचा उद्दमपणा, पालिकेतील कोरोनाबाधित कर्मचा-याची अन्य विभागात नियुक्ती

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कोरोनाबाधीत कर्मचा-याची अन्य विभागामध्ये नियुक्ती करण्याचा सपाटा प्रशासनाने लावला आहे. नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांचे शासकीय वाहनचालक अकबर हाशम सय्यद यांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधन झालेले असताना त्यांच्याजागी पुन्हा कोरोनाबाधीत कर्मचारी नियुक्त करण्याचा उद्योग प्रशासनाने केला आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रशासन विभागातील अधिका-यांचा सावळा गोंधळ उजेडात आला आहे.

नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांचे पूर्वीचे वाहनचालक अकबर सय्यद यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर ऐवले यांनी पालिका प्रशासनाकडे नवीन वाहनचालकाच्या नियुक्तीची मागणी केली. मात्र, प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर यांनी टाळाटाळ केली. तीनवेळा मागणी केल्यानंतर नगरसचिव विभागातील निवृत्ती सदाशिव उभे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, उभे यांचा रिपोर्ट काही दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. ते वैद्यकीय उपचार घेत आहेत. तरी, देखील प्रशासनाने त्यांची ऐवले यांच्या मोटारीवर चालक म्हणून तात्पुरती नियुक्ती केली आहे.

ऐवले यांचे पूर्वीचे वाहनचालक सय्यद यांचे दुर्दैवी निधन झाले. याचा प्रशासनाने विचार न करता पुन्हा ऐवले यांच्या मोटारीवर तब्बल एक महिन्यानंतर बाधित कर्मचा-याची नियुक्ती केली आहे. उद्या या कर्मचा-याचे बरेवाईट झाल्यास किवा त्याच्यामुळे अन्य अधिकारी, कर्मचारी बाधित झाल्यास याची जबाबदारी प्रशासन घेणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. उभे यांना आरामाची गरज आहे. त्यांच्यावर चांगले उपचार होण्याची गरज असताना त्यांची अशा प्रकारे नियुक्ती करणे म्हणजे अधिकाराचा गैरवापर करण्याचाच प्रकार आहे. याबाबत आयुक्तांनी प्रशासन अधिकारी लोणकर यांना समज देण्याची गरज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button