breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मविआतील दोन बडे नेते भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले..

मुंबई | भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. मविआतील दोन बड्या नेत्यांची पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांसोबत चर्चादेखील सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली आहे. मोदींची गॅरंटी आणि आत्मनिर्भर भारत संकल्पाला साथ देण्यासाठी अनेक लोक आमच्याकडे येण्याची तयारी करत आहेत. काहीजण तयारीत आहेत. परंतु, तुम्हा पत्रकारांकडे असलेली माहिती माझ्याकडे नाही. परंतु कधीही काहीही होऊ शकतं. मोदींना साथ देण्यासाठी कोणीही आमच्याकडे येऊ शकतं.

जयंत पाटील आणि त्यांचा मुलगा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. यावर बावनकुळे म्हणाले, जयंत पाटील आणि माझी कुठेही कसलीही चर्चा झालेली नाही. त्यांनी आमच्या पक्षात येण्यासाठी संपर्क केलेला नाही. किंवा त्यांचं माझ्याशी काही बोलणं झालेलं नाही. या कदाचित कपोकल्पित बातम्या असतील. तरीही पंतप्रधान मोदींना साथ देण्यासाठी आमच्याकडे कोणीही येऊ शकतं.

हेही वाचा     –      ‘..तेव्हा मंडल आयोगाची चूक झाली’; मराठा आरक्षणावर उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य 

मोदींनी देशाला विकासाची गॅरंटी दिली आहे. त्यांच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कोणी भाजपात येणार असेल तर आमचा दुपट्टा त्यांच्यासाठी तयार आहे. आम्ही कोणालाही आमच्या पक्षात घेण्यासाठी तयार आहोत. आमच्याकडे जागा आहे. त्यामुळे आम्ही कोणलाही नाही म्हणणार नाही. आमच्या विचारधारेवर पक्षात जी काम करण्याची पद्धत आहे, त्या विचारधारेला अनुसरून काम करावं लागतं. त्यासाठी कोणीही पक्षात आलं तर आम्ही त्याचं स्वागत करू, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच भाजपात जातील अशा अफवा पसरल्या आहेत. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पाला साध देण्यासाठी जे लोक भाजपात येणार असतील त्यांच्यासाठी भाजपाचा दुपट्टा तयार आहे. परंतु, विजय वडेट्टीवार यांनी अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button