breaking-newsपिंपरी / चिंचवड

महिलेला दुकानात घुसून मारहाण

पिंपरी (महा ई न्यूज) – मेडिकलच्या दुकानात घुसून दोघांनी महिलेला मारहाण केली. तसेच तिच्यासह तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 22) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भोसरी येथे घडली.

शीतल भाऊसाहेब येलभर (वय 28, रा. साईकृपा सोसायटी, मोशी प्राधिकरण. मूळ रा. अवसरी, ता. आंबेगाव, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिवानी प्रसाद ताठे (वय 22, रा. राजवाडा, इंद्रायणीनगर, भोसरी), प्रसाद तुकाराम ताठे (वय 25, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी मधील जय गणेश साम्राज्य बिल्डिंग येथे शीतल यांचे अक्षदा मेडिकल हे दुकान आहे. शनिवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिवानी आणि प्रसाद हे पती-पत्नी दुकानात आले. दोघांनी अचानक आक्रमक होत शीतल यांना मारहाण केली. प्रसाद याने शीतल यांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने कपडे ओढले. त्यानंतर दोघांनी मिळून शीतल आणि त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button