breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिका आणि चीनमधील विमानसेवा बंद ट्रम्प यांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली:  चीन आणि अमेरिकेमधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरुन येणाऱ्या प्रवाशी विमानांवर बंदी घातली आहे. यामुळं 16 जूनपासून चीन आणि अमेरिका या दोन देशांमधील विमान सेवा बंद होणार आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीवरुन या दोन देशांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मागील काही दिवसांपासून चीनसोबत अमेरिकेने अनेक आर्थिक व्यवहार देखील तोडले आहेत.

चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभरात पसरला. सध्या कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात दिसून येत आहे. जगभरातील जवळपास सर्वच देश या जीवघेण्या व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. परंतु, सध्या इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत या व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वाधिक दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सतत दावा करत आहेत की, कोरोना हा एक मानवनिर्मित व्हायरस आहे आणि याची उत्पत्ती चीनमधील एका प्रयोगशाळेत करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button