breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,87,784 वर

  • मुंबईत 706, पुण्यात 372 नवे रुग्ण

मुंबई – सोमवारी दिवसभरात 4,009 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 16,87,784 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 10,225 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 104 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 15,24,304 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 44,128 वर पोहोचला आहे. तसेच सध्या 1,18,777 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत सोमवारी कोरोनाचे 706 नवे रुग्ण आढळले, तर 30 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,59,114 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,305 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 1,064 जण कोरोनामुक्त झाल्याने मुंबईत आतापर्यंत 2,30,602 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 372 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,24,666 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 7,927 इतका झाला आहे. तसेच काल आढळलेल्या 372 रुग्णांपैकी 133 रुग्ण हे पुणे शहरातील असून 113 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे पुणे शहराची रुग्णसंख्या आता 1,61,844 वर पोहोचली असून पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 87,996 इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button