breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जूनी सांगवीत रिटनिंग वाॅलचा खर्च पाण्यात ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नागरिकांच्या पैशाची अधिका-याकडून उधळपट्टी 

पिंपरी – सलग दोन दिवस पडलेल्या पावसाने मुळा नदी दुथडी भरुन वाहत आहे. जून्या सांगवीतील नदीच्या किना-यालगत राहणा-या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीसह मुळानगर, ममतानगर परिसरात पाणी घुसले आहे. याबाबत महापालिकेच्या स्थापत्य विभागाने सुमारे एक कोटी रुपये खर्च करुन नदी किनारी दगड रचून भिंती बांधल्या. तरीही नदीचे पाणी यंदा त्या दगडाच्या भिंतीतून झोपडपट्टी शिरले आहे. तसेच मैलाशुध्दीकरणाच्या पंम्पिंग स्टेशनही पाण्यात गेला आहे. त्यामुळे दगडी भिंती आणि पम्पिंग स्टेशनवर केलेला खर्च पाण्यात गेला असून नागरिकांच्या पैशाची अधिका-याकडून उधळपट्टी सुरु आहे. 

जूनी सांगवीत मुळा नदी काठी मुळानगर, ममता नगर आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी वसलेली आहे. त्या परिसरात सुमारे शंभर ते दीडशे कुटुंबे वास्तव्यास आहेत. दरवर्षी त्या परिसरातील झोपडपट्टीत पाणी शिरत होते. तसेच पाण्याच्या लाटाही झोपडपट्टीच्या घरांना लागत होत्या. यावर उपाय म्हणून महापालिका स्थापत्य विभागाने नदी किना-यालगत दगडी भिंती बांधून त्या जाळ्या लावल्या आहेत. त्यावर सुमारे एक कोटी रुपये खर्च केलेला आहे. हे काम गतवर्षीचे करण्यात आलेले आहे. यावेळी मुळा नदीला आलेल्या पुराने झोपडपट्टीच्या घरांना पाणी लागले नसले तरीही त्या दगडाच्या खळग्यातून सर्व परिसरात पाणी शिरले आहे. त्या दगडी भिंतीवर केलेला खर्च पाण्यातच गेला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या स्थापत्य विभागाने मैलाशुध्दीकरणाचे पंम्पिंग स्टेशनही किना-यालगत बांधले आहे. त्या पंम्पिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे मैल्याची दुर्गंधी सुटली आहे. यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोन्ही प्रकल्पावर सुमारे दीड ते दोन कोटीचा खर्च हा केवळ अधिकारी व लोकप्रतिनिधीनी हट्टापाई झालेला आहे.

मुळानगर येथील रिटनिंग वाॅलसह पंम्पिंग स्टेशनवर केलेल्या खर्च पाण्यात गेला आहे. हे प्रकल्प नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने केलेले नाहीत. केवळ अधिकारी व लोकप्रतिनिधीची टक्केवारी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी केलेले आहेत. हे प्रकल्प करु नयेत याकरिता स्थापत्य विभागाकडे पत्र व्यवहारही केला होता. परंतू, अधिका-यांनी चुकीचे काम केल्याने कोट्यावधी रुपयाचा चुना महापालिकेला बसला आहे. या प्रकल्पाची चाैकशी करुन अधिका-यांना निलंबित करावे, अशी मागणी मनसेचे सरचिटणी राजू सावळे यांनी केली आहे. 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button