breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

घरातील कामे न केल्याने बहीण-भावाचा सावत्र आईकडून छळ

पिंपरी –  घरातली सर्व कामे न केल्यास सावत्र आईकडून बहीण-भावाचा अमानुष छळ केला जात आहे. काम न केल्यास कधी काठीने तर गरम लोखंडी सळईने चटके देण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत. त्या सावत्र आई आणि वडिलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सावत्र आई आणि वडीलापासून सुटका व्हावी म्हणून  बहीण-भाऊ गावाला पळून चालले होते. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे ते पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्या यातना ऐकून आणि अंगावरील जखमा पाहून पोलिसांनाही आपले अश्रू आवरता आले नाही. पोलिसांनी पुढाकार घेत सावत्र आई आणि वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

घरातली सर्व कामं दोन बहीण-भावांकडून सावत्र आई करून घेत असे. कामांमध्ये काही चुका झाल्यास किंवा कामाला उशिर झाल्यास त्यांना काठीने मारहाण केली जात होती. कधी-कधी गरम सळईचे चटकेही दिले जात होते. काम न केल्यास त्यांना वेळोवेळी उपाशीही ठेवण्यात येत होतं. सावत्र आईच्या या कृतीला वडिलांचीही साथ होती.

दररोज होणारा हा त्रास सहन न झाल्याने त्या दोघांनी लातूर येथील गावाला आपल्या आईकडे जाण्याचा निर्णय घेतला. मोशीपासून ते चालत भोसरीपर्यंत आले. तेथून लातूर येथे जाण्यासाठी कोणते वाहन मिळेल ,याबाबत नागरिकांकडे चौकशी करत होते. ही बाब एका नागरिकाने पोलिसांना सांगितली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्या दोघांना ताब्यात घेतलं.

या निरागस मुलांच्या अंगावरील जखमा पाहून पोलिसांनाही आपले अश्रू अनावर झाले. त्यांनी त्या दोन्ही मुलांना घेऊन वायसीएम रुग्णालय गाठलं. तिथे त्या मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच अमानुष मारहाण करणाऱ्या सावत्र आई आणि वडिलांवर गुन्हा केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button