breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नव्या रुग्णांचा दर घसरला, ७३ हजार २७२ रुग्णांची नोंद, ९२६ मृत्यू

नवी दिल्ली – गेल्या २४ तासांत देशात ७३ हजार २७२ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले असून ९२६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

नव्या रुग्णसंख्येमुळे देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६९ लाख ७९ हजार ४२४ वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये ८ लाख ८३ हजार १८५ रुग्णांवर उपचार सुरू असून ५९ लाख ८८ हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत १ लाख ०७ हजार ४१६ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

देशभरातून महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच २ लाख ३६ हजार ९४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याखालोखाल कर्नाटकात १लाख १८ हजार ८७० तर, केरळामध्ये ९१ हजार ८४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आयसीएमआरने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात शुक्रवारी ११ लाख ६४ हजार ११८ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ८ कोटी ५७ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button