breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीत २६ जानेवारी रोजी झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता, SIT च्या चौकशीतून माहिती

नवी दिल्ली – शांततेत आणि संयमाने सुरू असलेल्या कृषी आंदोलनाला २६ जानेवारी रोजी हिंसक वळण लागलं. लाल किल्ल्यावरही गोंधळ झाला. यामुळे तिरंग्याचाही अपमान झाला. मात्र, हा हिंसाचार म्हणजे पूर्वनियोजित कट होता, अशी माहिती SIT चौकशीतून समोर आली आहे.

आंदोलनास्थळी उपद्रव माजवण्यासाठी काही समूहांना लाल किल्ला आणि आयटीओवर एकत्र येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या समूहांचा उद्देश गर्दीत सहभागी होऊन उपद्रवाची सुरुवात करणे आणि आंदोलनकर्त्यांना गर्दीचा हिस्सा बनवून हिंसेत सहभागी करणे हा होता, अशी माहिती मिळाली आहे.

वाचा :-आज देशभर तीन तास चक्का जाम, फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना जाऊ देणार

इकबाल सिंहनं भडकावलं
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार इकबाल सिंह नावाच्या एका दंगेखोरानं लाल किल्ल्यावर गर्दी जमा केली. त्या गर्दीला भडकावलं आणि लाहोर गेट तोडण्यासाठी सांगितलं. इकबालच्या सांगण्यावरुन उपद्रवी लोकांनी लाहोर गेट तोडलं. दिल्ली पोलिसांनी इकबाल सिंहवर 50 हजार रुपयांचा इनाम ठेवला आहे.

150 जणांना अटक, 44 एफआयआरची नोंद
व्हिडिओ तपासल्यानंतर पोलिसांनी तज्ज्ञांच्या मदतीने छायाचित्रे काढली आणि प्रसिद्ध केली. यापूर्वी गुन्हे शाखेने 12 दंगेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 44 एफआयआर नोंदविल्या आहेत, त्यामध्ये सुमारे दीडशे जणांची अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे पोहोचल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांचे विशेष तपास पथक सीसीटीव्ही कॅमेरे, व्हायरल व्हिडिओ, मीडिया कॅमेरे, दिल्ली पोलिसांचे कॅमेरे आणि जनतेच्या आवाहनानंतर पोलिसांना मिळालेल्या सुमारे पाच हजार व्हिडिओंची चौकशी करीत आहे. या तपासानंतर पोलिसांनी या दंगेखोरांना ओळखले. आतापर्यंत त्यांनी 8 दंगेखोरांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे.

दीप सिद्धू कुठे आहे?
हिंसाचार संदर्भात गुन्हे शाखेचा तपास अत्यंत सावकाश सुरू आहे. प्रकरण ताब्यात घेतल्यानंतर एसआयटीने आतापर्यंत केवळ दोन लोकांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दीप सिद्धूच्या शोधात पोलिस हरियाणा आणि पंजाबमध्ये तळ ठोकून आहेत. अनेक ठिकाणी छापे टाकूनही पोलिसांना यश मिळत नाही. दीप सिद्धू सतत आपले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन स्पष्टीकरण देत आहे आणि दिल्ली पोलिसांना आव्हान देत आहे. मात्र, प्रत्येकवेळी तो पोलिसांपेक्षा दोन पाऊल पुढे आहे. यामुळेच पोलिसांनी आता जनतेची मदत मागितली असून दीप सिद्धू याच्यासह चार जणांची माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button