breaking-newsराष्ट्रिय

ग्राहक मूल्य निर्देशांक चलनफुगवटा चार महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर

नवी दिल्ली : किरकोळ बाजारात महागाई सलग चौथ्या महिन्यात वाढत असून मे मध्ये ती आणखी वाढल्याने अन्न आणि इंधनाचे भाव वाढले. यामुळे ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI) आधारित महागाई ४.८७ टक्क्यांवर पोहचली आहे. हे प्रमाण एप्रिलमध्ये ४.५८ टक्के इतके होते.

अन्न आणि पेयांच्या भागात फुगवटा वाढलेला दिसून तो मे मध्ये ३.३७ टक्क्यांवर पोहचला. एप्रिलमध्ये हे प्रमाण ३ टक्के होते. तर इंधन आणि प्रकाश क्षेत्रात हे प्रमाण ५.८ टक्केराहिले. एप्रिलमध्ये हे प्रमाण  ५.१६ टक्क्यांवर होते.

यात अन्नाच्या विशेषतः फळ आणि भाजीपाला बाजारात काही प्रमाणात किंमती वाढल्याचे नोंदवले गेले. असे असले, तरी एकदा पाऊस सुरू झाल्यास भाजीपाल्याच्या किंमती खाली येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button