breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोठी बातमी! नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात; जात प्रमाणपत्र न्यायालयाने केलं रद्द

मुंबई – खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अखेर उच्च न्यायालयामार्फत रद्द करण्यात आलं आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

वडिलांचं सर्टिफिकेट रद्द केल्यानंतर आजोबांच्या नावाने खासदार नवनीत राणा यांनी सर्टिफिकेट बनवलं होतं. परंतू, उच्च न्यायालयाने यावर आक्षेप घेतला आणि त्यांना कॉन्स्टिट्युशन फ्रॉड म्हणून 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे.

दरम्यान, जात प्रमाणपत्र असल्याशिवाय खासदारकी कायम राहत नाही. त्यामुळे आता त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. 2017 मध्ये माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 4 वर्षानंतर निकाल लागला असला तरी आम्ही न्यायालयाच्या निकालावर खूश आहे, अशी माहिती अडसूळ यांनी दिली आहे. दरम्यान, न्यायाचा विजय झाला, असं देखील आनंदराव अडसूळ म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button