breaking-newsमहाराष्ट्र

कोल्हापूरात राहत्या घरी जवानाची आत्महत्या

 कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्‍यातील दुंडगे गावातील लखन गंगाधर पाटील (वय 28) या जवानाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
लखन हे भारतीय सैन्य दलात बॉम्बे इंजिनिअर ग्रुपमध्ये 9 वर्षांपूर्वी भरती झाले होते. 20 दिवसांपूर्वी ते सुट्टीसाठी गावी आले होते. घरातील भांडण-तंट्यामुळे लखन मानसिक तणावाखाली होते. लोखंडी सळीला दोरखंड लावून त्यांनी गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी रात्री 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास घडली. लखन यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी व लहान मुलगी असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button