breaking-newsमनोरंजन

ऐश्‍वर्याचा “फन्ने खान’ पुन्हा लांबणीवर

ऐश्‍वर्या राय-बच्चनचा आगामी चित्रपट “फन्ने खान’च्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 3 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ऐश्‍वर्या रायच्या ऑपेझिट राजकुमार राव हा भूमिका साकारत आहे. या दोन स्टार्स कलाकारांशिवाय चित्रपटात अनिल कपूरही झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची घोषणा निर्मात्यांनी गुरुवारी केली होती.

दरम्यान, हा चित्रपट 15 जून रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, त्यात बदल करून 13 जुलै रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, 13 जुलै रोजी सलमान खानचा “रेस-3′ चित्रपट प्रदर्शित होत असल्याने रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट 3 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

“फन्ने खान’ चित्रपटा ऐश्‍वर्या राय एका गायिकेची भूमिका साकारत आहे. तसेच ऐश्‍वर्या राय-अनिल कपूर ही जोडी तब्बल 15 वर्षानंतर पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे. यापूर्वी या दोन्ही स्टार्सनी “हमारा दिल आपके पास है’ आणि “ताल’ या चित्रपटात एकत्रित काम केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button