breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रजासत्ताक दिनानिमित्त थेरगावात विद्यार्थ्यांचे भव्य-दिव्य पथसंचलन

  • तीन हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
  • 29 राज्यांतील संस्कृतीचे घडणार दर्शन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका माध्यमिक विद्यालय थेरगाव आणि थेरगाव डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने येथील ग क्षेत्रीय कार्यालय, संचेती विद्यालय, मनपा शाळा संकुल, वाकड पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचा-यांच्या सहकार्याने 71 व्या गणराज्य दिनानिमित्त उद्या थेरगावात विद्यार्थ्यांचे दिमाखदार पथसंचलन सादर होणार आहे.

उद्या रविवारी (दि. 26) सकाळी सात ते साडेआठपर्यंत संचलन सोहळा होणार आहे. विद्यार्थ्यांचे पथसंचलन थेरगाव फाटा ते रॉयल कोर्ट, वनदेवनगर, संचेती स्कूल, क्रांतीवीरनगर, बारणे कॉर्नर ते साईनाथ मंदीरमार्गे स्वीस काऊंटी तसेच पुढे ग प्रभाग कार्यालय याठिकाणी सांगता होणार आहे. सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या पथसंचलनात थेरगाव शाळा संकुलातील 3 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. 35 संचलन पथकांसह 1 हजार नागरिक सहभागी होणार आहेत.

पथकातील विद्यार्थी भारतातील 29 राज्यातील विविध संस्कृती, परंपरांचे दर्शन घडविणारी वेशभूषा परिधान करणार आहेत. त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी योगदान दिले अशा महापुरूषांची वेशभूषा करुन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विविध कला व क्रिडा प्रकारांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर यांचे पथक देखील यामध्ये सहभाग घेणार आहे.

राष्ट्र उभारणी व जनजागृतीचा उद्देश, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छता अभियानाची जागृती, सुमारे हजार स्वयंसेवकांचा सहभाग, थेरगाव परिसरातील नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग लाभणार आहे. सर्व नागरिक एकाच सुरात राष्ट्रगीत गायन करणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे पथसंचलन केवळ थेरगावातच पहायला मिळते. विविध सांस्कृतीक आणि पारंपरिक सादरीकरणाने थेरगावात दर्शन घडणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button