breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय संघातून स्थान गमावण्यावर अखेर युजवेंद्र चहलने सोडलं मौन; म्हणाला..

Yuzvendra Chahal : वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये युजवेंद्र चहलच नाव नव्हतं. दरम्यान यावरून युजवेद्र चहलने मौन सोडलं आहे. वर्ल्ड कप टीममध्ये निवड न होणं, हे निराशाजनक आहे, असं युजवेंद्र चहलने म्हटलं आहे.

युजवेंद्र चहल म्हणाला, वर्ल्ड कप टीममध्ये निवड न होणं, हे निराशाजनक आहे. त्यावर तो हसला. करीयरमध्ये माझ्यासोबत तिसऱ्यांदा असं घडतय. फक्त १५ प्लेयरची टीममध्ये निवड होऊ शकते, कारण हा वर्ल्ड कप आहे. इथे तुम्ही १७ ते १८ प्लेयर्सची निवड करु शकत नाहीत. मला थोडं वाईट वाटतय. पण पुढे चालत रहायच हा माझ्या आयुष्याचा उद्देश आहे. मला आता याची सवय झालीय. असं तीन वर्ल्ड कपमध्ये झालय.

हेही वाचा – ठाकरेंसोबत आमचा साखरपुडा झाला, परंतु लग्नासाठी दोन भटजींचा अडथळा! प्रकाश आंबेडकरांचा टोला

सिलेक्शन मागचा विचार मी समजू शकतो. जेव्हा केव्हा संधी मिळेल, तेव्हा सर्वोत्तम कामगिरी करायची, हेच माझं उद्दिष्ट्य आहे. भारतीय टीममधील दुसऱ्या स्पिनर्सबरोबर असलेल्या स्पर्धेबद्दल मी फार विचार करत नाही. मला एक गोष्ट ठाऊक आहे, मी चांगलं प्रदर्शन केलं, तर मी खेळणार. भविष्यात कोणीतरी तुमची जागा घेणार, कधीतरी तो दिवस येणारच, असंही युजवेंद्र चहल म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button