पिंपरी / चिंचवड

प्रतिबंधित गुटखा बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा एका तरुणाने स्वतःकडे बाळगला. पोलिसांनी त्याला गुटखा, दुचाकी आणि मोबाईल सह अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 30) दुपारी बोडकेवाडी फाटा माण येथे करण्यात आली.

अक्षय बाबुलाल रंकावत (वय 26, रा. धुमाळवस्ती, माणगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह रामदेव देवासी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रवी पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय याने त्याच्याकडे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा बाळगला. याबाबत हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बोडकेवाडी फाटा येथे सापळा लावून अक्षय याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांना प्रतिबंधित गुटखा आढळून आला. गुटख्यासह मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण 62 हजार 90 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button