पिंपरी / चिंचवड

लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या : प्रियकरावर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

तरुणीसोबत पाच वर्ष प्रेमसंबंध ठेऊन तिला लग्नासाठी नकार दिला. या मानसिक त्रासातून तरुणीने आत्महत्या केली. ही घटना 25 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेपाच वाजता संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मयत तरुणीच्या आईने 13 एप्रिल रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पप्पू उर्फ सुनील शाम गोलाईत (वय 25, रा. परभणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी यांचे मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी सुनील याने तरुणीसोबत लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते. पिडीत तरुणी ही वेगळ्या जातीची आहे. तो उच्चवर्णीय आहे अशा कारणावरून 4 फेब्रुवारी रोजी तरुणीला फोनवरून लग्नासाठी नकार दिला. त्यातून तरुणाने तिला मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button